▪️ आरोपीकडे लाखो रुपये ,सोने चांदी वितळवण्याची सापडली मशीन,चोरी अथवा दरोड्यातील आरोपी असण्याची शक्यता..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

गावठी पिस्तुल, सिंगल बॅरेल बंदूक, तलवारीसह सोने, चांदी आणि लाखोंच्या कॅश सह गोव्यातील आरोपीला सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने वागदे येथे अटक केली आहे.प्रकाश विनायक पाटील (रा गोवा) याच्याकडे अवैध शस्त्रसाठा आणि सोने चांदी चे दागिने रोकड असल्याची टीप सिंधुदुर्ग एलसीबी ला मिळाली होती.त्यानुसार एलसीबीच्या पथकाने 12 जुलै रोजी वागदे येथे छापा मारून आरोपी प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे रोख लाखोंची रक्कम, गावठी पिस्तुल, सिंगल बॅरेल बंदूक, तलवारी, 15 तोळेहुन अधिक सोने,साडेचार किलो चांदी तसेच सोने चांदी वितळवण्याची मशीन सापडली आहे.आरोपी प्रकाशवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page