✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोरे नं १, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवजे ओझरवाडी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वजराट नं १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होडावडा नं १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घावनाळे भुईवाडा येथील ३४ गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोरे नं १ च्या ५ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं १ च्या २ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवजे ओझरवाडीच्या ४ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वजराट नं १ च्या ११ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होडावडा नं १ च्या ५ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घावनाळे भुईवाडाच्या ७ दुर्ग मावळा परिवारातर्फे छत्री वाटप करण्यात आले.

या छत्री वाटप उपक्रमासाठी शंकर कोराणे यांनी ५ छत्र्या, स्वाती कविटकर यांनी ५ छत्र्या, आकाश निकम यांनी २ छत्र्या, संजय निकम ५ छत्र्या, राजू सावंत १ छत्री, मिलिंद जाधव २ छत्र्या, स्मरणिका गावडे ५ छत्र्या, रुपेश चव्हाण १ छत्री, नंदू वाळके १ छत्री, समीर सावंत १ छत्री, भूषण खडपकर १ छत्री, मंदार सामंत १ छत्री, राजन रणसिंग १ छत्री, स्पृहा दाभोलकर २ छत्र्या, नारायण येंडे यांनी १ छत्री सौजन्य केले.

सर्व दात्यांचे दुर्ग मावळा परिवाराकडून विशेष आभार गरजूंना मदत करताना छायाचित्र काढणे योग्य नसलेने सदर उपक्रमाचा फोटो काढण्यात आलेला नाही.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला असे गरजू विद्यार्थी शोधण्यासाठी मदत करू शकता अथवा या उपक्रमासाठी एक छत्री देऊन सहकार्य करू शकता. (छत्री सौजन्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींना छत्री वाटप केलेल्या शाळा व विद्यार्थ्यांचे नाव वैयक्तिक पाठवण्यात येईल) या उपक्रमाच्या अधिक माहिती साठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधा अथवा Whatsapp च्या माध्यमातून संदेश पाठवा.९८६०२५२८२५ /९४२२२६३८०२ असे आवाहन दुर्ग मावळा परिवार यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page