ब्युरो न्यूज /-
●•अनलॉक ५ साठी केंद्राने केली विविध सुविधा सुरू करण्याची घोषणा. १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यास परवानगी मात्र निर्णय राज्यांकडे सोपवला.
●•राज्यातील अनलॉक ५ साठी मार्गदर्शक तत्व जाहीर. ५ तारखेपासून ५० टक्के क्षमतेने हॉटेल, फुडकोर्ट आणि रेस्टॉरंट व बार सुरु होणार.
●•राज्यातील विज मंडळातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तीनही कंपन्यांमधील कंट्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा सुरु : मंत्री तनपुरे.
●•हाथरस पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या कॉग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा यांना पोलिसांनी केली अटक.
●•कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा कॉंग्रेसचा आरोप. देशभरातुन कॉंग्रेसने केला निषेध.
●•मराठा आरक्षणावरुन पार्थ अजित पवार आक्रमक, सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा. ट्विट वरुन राजकीय चर्चा सुरु.
●•उत्तरप्रदेशमधील हाथरसपाठोपाठ बलरामपुरमधेही तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
●•देशात २४ तासांत ८६ हजार ८२१ नवे कोरोनारुग्ण तर ११८१ जणांचा मृत्यू. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.
●•देशातील कोरोनाबाधीतांचा संख्या ६३ लाख पार आत्तापर्यंत ५३ लाख ७३ हजार २०२ जणांची कोरोनावर मात.
●•राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायणराव राणे यांना कोरोनाची लागण. स्वतः ट्विटरवरुन दिली माहिती.