✍🏼लोकसंवाद /- देवगड.

देवगड एज्यूकेशन बोर्ड, मुंबई. केळकर हायस्कूल, वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेच्या नवनिर्मित प्रशस्त क्रिडांगणाचे निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दिक्षित असे नामकरण आले.

नामकरणाचे उद्घाटन अनंत करंदिकर (हुर्शी) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन व दीपप्रज्ज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक माने यांनी केले.

देवगड एज्युकेशन बोर्डाचे सह कार्यवाह निरंजन दीक्षित यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ रुपये सात लाखाची भरघोस देणगी शाळेला प्रदान केली सदर देणगीतून शाळेसाठी सर्व सोईनी युक्त असे क्रीडांगण तयार केले जात आहे. सदर नामकरण सोहळ्यास देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष पवार साहेब, मुख्य चिटणीस धुरी, निरंजन दीक्षित, विकास दीक्षित सर, करंदीकर, ऐनापुरे, तानवडे, सुरेश देवळेकर, मंजुश्री पाटणकर, शालेय समिती अध्यक्ष पुजारे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

संगित विषयात हार्मोनियम वादन व पखवाज वादनात गांधर्व महाविद्यालयाच्या तिस-या परीक्षेत अनुक्रमे संस्कृती जोशी व किर्ती पुजारे यानी विशेष प्राविण्य प्राप्त केले त्यानिमित्त कु. संस्कृती व किर्ती हिचे निरंजन दीक्षित यांच्या कडून रोख पारितोषिक रु. पाचशे व प्रशालेचे माजी विद्यार्थी डी. के. केळकर यांच्याकडून रु. एकशे पन्नास असे पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. तसेच त्यांना मार्गदर्शन करण्या-या वेलणकर मॅडम यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.

विकास दीक्षित, तानवडे, पाटणकर, धुरी यांनी आपली मनोगत व्यक्त केली. पाटणकर यांनी निळकंठ दिक्षित यांविषयी काही आठवणी सांगितल्या पवार यांनी अध्यक्षिय भाषणात निरंजन दीक्षित साहेबांच्या दातृत्व, नेतृत्व व कर्तुत्व या गुणांचे कौतुक केले. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. पवार यांनी मान्यवरांचे आभार मानले सर्व मुलांना निरंजन दीक्षित यांच्याकडून खाऊवाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page