✍🏼लोकसंवाद /- देवगड.
देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या पदग्रहण सोहळा शुक्रवार दिनांक ७ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला म्हापसा येथील फर्स्ट डीजे गुरुदत्त भक्ता हे यावेळी इन्स्टॉलिंग ऑफिसर होते तसेच झोनल कोऑर्डिनेटर रोटेरियन राजन बोभाटे सचिन गावडे एजी संजय पुनाळेकर चार्ट सेक्रेटरी आर्ट डीसी आणि मेमन आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते पोस्ट पास्ट प्रेसिडेंट सी पाच पारकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर मनस्वी घारे यांनी संपूर्ण वर्षभराच्या कार्याचा आढावा घेतला यावर्षीचा 2023 24 साठी गुरुदत्त भक्ता यांनी प्रेसिडेंट प्रवीण पोकळे सेक्रेटरी विजय बांदिवडेकर ट्रे झरर अनिल कोरगावकर यांची नियुक्ती केली.
तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर यांची नियुक्ती केली या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने रोटरीच्या पाल्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये राज रमाकांत आचरेकर दहावी उत्तीर्ण आर्किटेक्ट झाले बद्दल साक्षी श्रीपाद पारकर हिला गौरविण्यात आले तसेच जामसंडे हायस्कूल मधील प्रथम क्रमांक प्राप्त मधुरा मृत्युंजय मुणगेकर इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम क्रमांक वरद सदाशिव सरोळकर देवगड हायस्कूलची तालुक्यात प्रथम व सिंधुदुर्गमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेली कुमारी राजसी इंद्रनिल ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे डॉक्टर केएन बोरफळकर यांच्या अथक सेवेबद्दल व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले पास्ट प्रेसिडेंट म्हणून डॉ. प्रमोद आपटे यांचाही सत्कार करण्यात आला तसेच यशस्वी उद्योजिका सौ रंजना रामचंद्र कदम यांना तर १९८६ पासून प्रायव्हेट शववाहिका म्हणून कार्यरत असणारे नितीन भालचंद्र देशपांडे यांचाही व्होकेशनल अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला सचिन गावडे संजय पुनाळेकर यांनी देवगड क्लबला मार्गदर्शन केले पीडीजी गुरुदत्त यांनी रोटरी काय आहे त्याची ताकद काय असू शकते आपला क्लब काय करू शकतो.
सिंधुदुर्ग मधील जवळजवळ सर्वच रोटरी यांची नावे घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला जिल्ह्यातील सर्वच प्रेसिडेंट क्लब मेंबर्सनी यावेळी गौरव केला जिल्ह्यातील सर्वच प्रेसिडेंट क्लब मेंबर्स यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल गांधी आणि संजय धुरी आभार संजय धुरी यांनी मानले रोटरी क्लब मँगो सिटी देवगडचे डायरेकटर पुढील प्रमाणे प्रेसिडेंट प्रवीण पोकळे सेक्रेटरी विजय बांदिवडेकर ट्रेझर अनिल कोरगावकर व्हाईस प्रेसिडेंट संजय धुरी, सार्जंट आर्म्स नरेश डांमरी, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी मनस्वी घारे, जॉईंट ट्रेझरर गौरव पारकर, डायरेक्ट कम्युनिटी सर्विस मनीषा डांगरी डायरेक्ट क्लब सर्विस अनिल गांधी, डायरेक्ट व्होकेशनल सर्विस किरण पोकळे, डायरेक्ट इंटरनॅशनल सर्व्हिस अशोक मुजुमळे डायरेक्टर न्यू जनरेशनन दयानंद पाटील, डायरेक्ट पोलिओ प्लस रुपेश पारकर, चेअरमन मेंबरशिप हनिफ मेमन चेअरमन ऍडमिनिस्ट्रेशन महेश घारे, चेअरमन रोटरी फाउंडेशन राजेंद्र भुजबळ चेअरमन सर्विस प्रोजेक्ट रमाकांत आचरेकर, चेअरमन पब्लिक इमेज प्रकाश गायकवाड चेअरमन क्लब लिटरसी अनुश्री पारकर, चेसरमन फोलिशिप सुनील पारकर चेअरमन हिस्टोरियन श्रीपाद पारकर याप्रमाणे आहेत फोटो- १) पदग्रहण सोहळा उदघाटन करताना मान्यवर २) डॉ के एन बोरफळकर यांचा सन्मान करताना रोटेरियन ३) नवनिर्वाचित प्रेसिडेंट व अन्य.