✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
वेंगुर्ला तालुक्यातील कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कुल आडेली या विद्यालयातील गरीब व होतकरू 8 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप संस्था कार्यवाह प्र. ना. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
यावेळी शालेय समिती अध्यक्ष सुरेश धुरी, माजी सरपंच प्रकाश गडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष योगेश कुबल, वजराट विकास सोसायटी चेअरमन वसंत पेडणेकर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष राजेश सामंत,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष प्रशांत शेणई, वामन भोसले,विठ्ठल आरोलकर आदी उपस्थित होते. संस्था अध्यक्ष दिगंबर नाईक, कार्यवाह प्र. ना.नाईक, चंद्रकांत गडेकर, सुरेश धुरी, सच्चिदानंद धर्णे, पुरुषोत्तम धर्णे,प्रकाश गडेकर, योगेश कुबल,संदीप होडावडेकर,तुषार कांबळी यांचे सायकलींकरिता योगदान लाभले.यावेळी मुख्याध्यापक देवानंद चव्हाण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
