✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
जमिनीवर विजेच्या तारा कोसळून पडल्यामुळे विजेच्या धक्क्याने दोन कुत्र्यांचा बळी घेतला आहे.नेरूर वालावल रस्त्यावर आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल समोर मध्यरात्री विजेच्या तारा कोसळून पडल्या होत्या.त्यामध्ये या दोन मुक्या जनावरांचा जीव गेला आहे.मध्यरात्री लागलीच नेरूर चे वायरमन वैभव ठाकूर यांनी लाईन बंद केली.आणि पुढील अनर्थ टळला.त्यानंतर वैभव ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्युत तारा जोडत सकाळी लाईट पूर्ववत केली.
