▪️राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थान आता कार्यकर्ते जमू लागले,पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे. त्यांनी भाजपसोबत जात सत्तेची सूत्रे हाती घेतली आहे. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या आमदारांची 9 इतकी संख्या आहे. तसेच यामध्ये पहिली महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता या राजकीय घडामोडींवर पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मोठा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. अजित पवार यांच्यासोबत जेवढे गेले आहेत त्यातील 80 टक्के आमदार परत येणार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आला आहे. अनेक आमदार आज संध्याकाळपर्यंत पुन्हा राष्ट्र काँग्रेस पक्षात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशा जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आता कार्यकर्ते जमू “ लागले आहेत. त्यामुळे पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत मिळत आहे.
