▪️बसच्या काचा फोडून बाहेर आलेले ८ प्रवासी सुदैवाने वाचले..
✍🏼लोकसंवाद /- बुलढाणा.
नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. प्रथम बस एका खांबावर जोरात धडकली आणि पलटी झाली. त्यानंतर बसला भीषण आग लागली. हा अपघात समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा येथे झाला आहे. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत होते. या बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू जागीच होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ही बस एका बाजूला कोसळली त्यामुळं दरवाजा उघडण्याचा मार्ग बंद झाला होता आणि बाहेर पडण अशक्य झालं. बसमधील ८ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. काचा फोडून बाहेर आल्याने त्या प्रवाशांचा जीव वाचला आहे. हा अपघात १.२६ मिनिटांनी अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये नागपूर,वर्धा आणि यवतमाळ मधील प्रवासी होते.