▪️मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागाकडे होत्या कार्यरत..


✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी वृणाल मुल्ला यांनी पदभार स्वीकारला आहे.तर बदली झालेले पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांनी मुंबई येथील पदभार स्वीकारला आहे.

कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर काही काळासाठी श्रीमती नदाफ यांनी या पदाचा पदभार सांभाळला. दरम्यान मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागाकडे कार्यरत असणाऱ्या वृणाल मुल्ला यांना कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांनी हा पदभार सोडून मुंबई येथे हजर झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page