✍🏼लोकसंवाद /-मालवण.
जिल्हा नियोजनमधून आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतलेल्या माळगाव येथील लाईन शिफ्टिंग कामाचे भूमिपूजन गावठणवाडी येथे उपसरपंच शशिकांत सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.गावठणवाडी येथील ग्रामस्थांकडून आमदार वैभव नाईक यांच्याकडे या विकास कामाची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत या कामासाठी तात्काळ सुमारे १.७२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या कामाची प्रत्यक्ष देखील सुरुवात करण्यात आली. येथील काम मंजूर केल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, सरपंच चैताली साळकर, ग्रामपंचायत सदस्य किशोर कासले, राजश्री शेलार, अंकिता कासले, योगेश शेलार, प्रकाश बागवे, सतीश नाईक, लाईनमन स्वप्नील धामापुरकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
