✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ही मोहीम ग्रामपंचायत स्तरावर राबवा, अशी मागणी वेंगुर्ले भाजपच्या वतीने महसूल व कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना केवायसी, बँक खाते, आधार संलग्न अशा गोष्टी शहरात येऊन करणे शक्य नाही. त्यामुळे अनेक जण या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. वेंगुर्ले भाजपच्यावतीने तहसीलदार ओंकार ओतारी व कृषी अधिकारी निरंजन देसाई यांची भेट घेण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, ता. उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, दादा केळुसकर, परबवाडा उपसरपंच पपु परब, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, शक्ती केंद्र प्रमुख ताता मेस्त्री, सोशल मीडियाचे राजु परब, ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर, रामु परब, नितीन कोचरेकर, माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, अनंत नेरुरकर, पांडुरंग सावंत, पंढरीनाथ राऊळ, लक्ष्मण वेतोरेकर, कृष्णाजी सावंत, वायंगणी माजी सरपंच सखाराम केळजी, संतोष सावंत, सुनील प्रभू खानोलकर, सौरभ नाईक, अंकुश पवार, ललीता पवार आदी भाजपा पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page