✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

येथील यशवंतराव भोसले डी.फार्मसी कॉलेजमध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र यांचे प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेश|सुविधा केंद्र सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता ऑनलाईन अर्ज भरणे व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. प्रवेशप्रक्रिये दरम्यान वेळोवेळी निर्गमित केले जाणारे शासन निर्णय व तारखा यांची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. तसेच विविध शिष्यवृत्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देखील दिली जाईल.प्रथम वर्ष डी.फार्मसीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 जुलै असून 5 जुलैला तात्पुरती व 11 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतरच संस्था निवडण्यासाठीच्या पसंतीक्रम फेरीला सुरुवात होईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरावेत असे आवाहन यशवंतराव भोसले डी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सत्यजित साठे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page