✍🏼लोकसंवाद /- ओरोस.

जिल्हा परिषदेच्या इमारतीवर लोखंडी पत्रे घालण्याचे काम सुरू आहे.गेले अनेक दिवस हे काम सुरू आहे. नेहमी प्रमाणे आज सकाळी हे काम सुरू असताना ९ वाजण्याच्या सुमारास जमशेद पाशा व नरेश सैनी हे दोन कामगार छपरावरून जमिनीवर कोसळले.या दोघांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील जमशेद पाशा याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर नरेश सैनी याला गंभीर दुखापत झाली फ्रॅक्चर झाले आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिसांत खबर देण्यात आली आहे. अद्याप याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page