✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे बुधवारी सायंकाळी कर्ली नदीकिनारी परिसरात पेट्रोलिंगसाठी गेल्या असताना काही वाळू व्यावसायिकांनी मोटारसायकल व तत्सम वाहनावरून त्यांचा पाठलाग केल्याची घटना घडली. या प्रकरणी एकाला कुडाळ पोलीस ठाण्यात आणून समज देण्यात आली.दरम्यान, प्रांताधिकारी घराबाहेर पडल्या की, त्यांचा पाठलाग करण्याचा प्रकार रोजच घडत असून वाळू व्यावसायिक असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांकडून हे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात ये आहे.बुधवारी प्रांताधिकाऱ्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांनी कुडाळ पोलिसांना कल्पना दिली.त्यानंतर संबंधिताला पोलीस ठाण्यात आणून समज देण्यात आली.जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी अशा प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई करायला हवी,अशी मागणी होऊ लागली आहे.
