✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरुन ठोकर दिल्याने कोलगाव येथे शिवशाही बसला अपघात झाला आहे.यात ८ प्रवासी आणि दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले आहेत.हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आंधळ्याचा चढाव येथे सावंतवाडी-कुडाळ मार्गावर घडला.
