▪️स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदूर्ग ची करवाई..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

गोवा बनावटीची अवैध दारू घेऊन जाणारी स्कॉर्पिओ मोटार कार काल ६.३०.वाजता देवसु वन विश्राम गृहासमोर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदूर्ग ने पकडून ३ लाख ६२ हजार २००रुपयांची दारूजप्त केली आहे.कृष्णा उर्फ राजन रमेश गुरव रा.वसोली, शेडगे वाड़ी ता. कुडाळ, सध्या रा. माजगाव ता. सावंतवाड़ी याला अटक केली आहे.७ लाख रुपये किमंती ची स्कॉर्पिओ मोटार असा एकुण १०लाख ६२हजार २००रूपयांचा मुद्दे माल जप्त केला आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक,सिंधुदुर्ग नितीन बगाटे,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश कदम,अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर,यशवंत आरमारकर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page