✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

वेंगुर्लेत सरकारी कार्यालयातील महत्त्वाची जमिनीची कागदपत्रे चोरीला गेल्याने प्रशासकीय यंत्रणेसह वेंगुर्लेमध्ये खळबळ उडाली आहे.ही महत्त्वाची कागदपत्रे गायब करण्यामागे मोठे रॅकेट असल्याची चर्चा वेंगुर्ले परिसरात बोलली जात असून,टेम्पो ही गायब झाल्याची चर्चा चर्चिली जात आहे.

वेंगुर्ले जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या बाजुला असलेल्या वेंगुर्ला तलाठी कार्यालयाच्या जुन्या स्टोरेज काॅटर्स मधून जमिनीचे फेरफार असलेली महत्त्वपूर्ण सरकारी कागदपत्रे चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.तर प्रशासकीय यंत्रणेस हलचल माजली आहे.

चोरीस गेलेली कार्यालयीन महत्त्वपूर्ण सरकारी कागदपत्रे :-१} ००,०० रू.सन १९५६ पासून ते सन २०१६ पर्यंतच्या मेळाच्या फाईल्स कागदपत्रे फेरफार क्रमांक १३०००ते फेरफार क्रमांक १६००० जु.वा.किं.सू. २} ००,०० रू.सन १९५६ पासून ते २०१६ पर्यंतचे आकारबंद रजिस्टर जु.वा.किं.सू.३} ००,०० रू.सन १९५६ पासून ते सन २०१६ पर्यंतचे दुरुस्त आकारफोड पत्रक कागदपत्रे जु.वा.किं.सू.४} ००,०० रू.सन १९५६ पासून ते सन २०१६ पर्यंतचे वेंगुर्ला शहरातील नकाशे जु.वा.किं.सू.५} ००,०० रू.सन १९५६ पासून ते सन २०१६ पर्यंतचे गाव नमुने ०४ ते २१ जु.वा.किं.सू.६} ००,०० रू.सन १९५६ ते सन २०१६ पर्यंतचे सर्व महत्त्वाचे कार्यालयीन शासकीय कागदपत्रे जु.वा.किं.सू.ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे चोरीस गेलेली आहेत.

दरम्यान ही कागदपत्रे टेम्पोतून भरून नेल्याचे वेंगुर्ले शहरात व तहसीलदार कार्यालयालय परिसरात बोलले जात आहे.ही महत्त्वाची कागदपत्रे गायब करण्यामागे मोठे रॅकेट असल्याची चर्चा वेंगुर्ले परिसरात बोलली जात असून, टेम्पो ही गायब झाल्याची चर्चा चर्चिली जात आहे.याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात मध्ये दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की,सदरचा हा चोरीचा गुन्हा २६ मे २०२३ रोजी ५ वाजता ते १ जून २०२३ रोजी ४-३० च्या कालावधीत घडला असल्याचे म्हटले आहे.हा प्रकार वेंगुर्ला जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या वेंगुर्ला तलाठी कार्यालयाच्या जुन्या स्टोरेज काॅटसमध्ये घडलेला आहे.याबाबतची फिर्याद वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयातील तलाठी ज्ञानेश्वर अंकुश गवते (वय २८ रा.बेलुरा,ता.बीड जि.बीड सध्या राहणार वेंगुर्ले कॅम्प वेंगुर्ला) यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिली आहे.

कुणीतरी अज्ञात चोरटय़ाने सरकारी कामाची महत्त्वाची असलेली कार्यालयीन शासकीय कागदपत्रे जु.वा.कि.सू.अशी सरकारी कामाची महत्त्वाची वर्णनाची कार्यालयीन कागदपत्रे फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे.याप्रकरणी अज्ञातावर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गु.र.नं.१०५ / २०२३ भा.द.वि.सं.क्र.३८० प्रमाणे फिर्यादीवरून पोलीस उपनिरीक्षक डी.एच.गवारी यांनी १ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.याबाबतचा पुढील तपास हवालदार बी.जी.चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page