ओरोस /-
28 सप्टेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथ शिक्षक पतपेढीच्या प्रधान कार्यालयात मा उर्मिला यादव,अधिक्षक जिल्हा उपनिबंधक कार्या सिंधुदुर्ग तथा अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये मा श्री दिनकर तळवणेकर,कुडाळ यांची अध्यक्ष पदी तर मा श्रीम निलम पावसकर,सावंतवाडी यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली.
सोशल डिस्टनसिंग चे सर्व नियम पाळत पतपेढी प्रशासनाने केलेल्या निवड प्रक्रियेच्या आयोजनाबाबत अधिक्षक श्रीम यादव मॅडम यांनी गौरवोद्गार काढले तसेच पातपेढीच्या आदर्शवत कामकाजाबाबत सर्व संचालकांचे अभिननंदन केले.
निवड प्रक्रिये नंतर नूतन अध्यक्ष,उपाध्यक्ष यांना शुभेच्छा व मावळते अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक मा भाई चव्हाण, मा चंद्रकांत अणावकर तसेच संघटनांनाचे राज्य,जिल्हा,तालुका पदाधिकारी,आजी माजी संचालक,उपस्थित होते.अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदी झालेल्या निवडीबद्दल मा तळवणेकर व पावसकर यांनी सर्व मालक सभासद,संघटना प्रतिनिधी व सर्व संचालकांचे आभार मानले.