✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
विवाहीत महीलेवर लैंगिक अत्याचार केले प्रकरणी प्रकरणी कांदुळी- माणगाव येथील राकेश दिनकर सावंत याची ओरोस येथील विशेष न्यायाधीश यांनी रक्कम रु. 15000/-च्या
सशर्त जामिनावर मुक्तता केली. आरोपी याचेवतीने ॲड.यतिश खानोलकर यांनी कामकाज
पाहीले.
प्रस्तुतची घटना माहे जुन 2019 ते मार्च 2023 या कालावधीत घडलेली होती. यातीलआरोपी राकेश सावंत रा. कांदुळी – माणगाव याने विवाहीत महीलेस लग्नाचे खोटे आमिष दाखवुन 5 वर्षे जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार करुन तिला ठार मारणेची धमकी दिली.अशी तक्रार सदर महीलेने कुडाळ पोलीस स्थानकात दिनांक 12 माहे मे 2023 रोजी दिलेली होती.
याप्रकरणी कुडाळ पोलीसांनी राकेश सावंत याचेवर भा. द.वि. कलम
376,376 (2) (जे) (एन) ,506 व अनुसुचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनीयम
कलम 3(1)r , 3(1)(w)i , 3(1)s ,3(2)(v) प्रमाणे तक्रार दाखल करुन दिनांक 13/05/2023
रोजी त्याला अटक केली होती व त्याला ओरोस येथील विशेष्| न्यायालयासमोर हजर केले
हेाते. सदर वेळी आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावणेत आलेली होती व तेव्हापासुन
आरोपी हा न्यायालयीन कोठडीत होता.याप्रकरणी आरोपीने जामिन मिळणेकरीता अर्ज दाखल केलेनंतर त्यावर सुनावणी होउुन प्रस्ततुचा अर्ज मंजुर होउुन विशेष न्यायालयाने त्याची सशर्त जामिनावर मुक्तता केली.