✍🏼लोकसंवाद /- चौके.
मालवण तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील तरुण श्री. वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील ( वय ४५ ) या तरुणाने बुधवार दिनांक ३१ मे रोजी पहाटे आपल्या राहत्या घरातील पडवीच्या वाश्याला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घरातील व्यक्तींच्या सकाळी ही बाब निदर्शनास येताच पोलीस पाटील विनायक प्रभु यांच्याशी संपर्क केला आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. जी. मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. आणि वामन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण येथे नेण्यात आला. दुपारनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर वामन यांच्या पार्थीवावर काळसे येथे अंत्यविधी करण्यात आले.
कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेला वामन पाटील हा काही दिवसांपुर्वी काळसे येथील आपल्या घरी आला होता. मृत वामन ऊर्फ बाबल पाटील याच्या पश्चात आई , पत्नी, एक मुलगी , एक मुलगा असा परिवार आहे . त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून कट्टा दुरक्षेत्राचे पोलीस पी. जी. मोरे आणि सिद्धेश चिपकर अधिक तपास करत आहेत.