ठिय्या आंदोलनानंतर अखेर सरमळ येथील त्या महिलेची तक्रार घेण्याची कारवाई सुरू..

महिला तक्रारदाराची विनयभंग तक्रार दाखल करण्यास कुडाळ पोलीसांची होत,होती,, टाळाटाळ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना थारा न देता अत्याचार असो वा विनयभंग करणाऱ्यांना पाठीशी घालू नका.त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.पण या आदेशांचे पालन करण्यात कुडाळ पोलिस प्रशासनान टाळाटाळ करतेय.काल मंगळवारी कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावात महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या गावचे तलाठी किरण सोनावणे यांना कुडाळ पोलिस पाठीशी घालत असल्याचे दिसून आल्याने व काल घडलेल्या घटनेची तक्रार न घेतल्याने आज कुडाळ पोलिसांच्या विरोधात कुडाळ व सरमळ येथील नागरिकांकडून तलाठयावर पोलीसांनी गुन्हे दाखल करावे व महिलेला न्याय द्यावा या मागणीसाठी सकाळी ११ वाजल्यापासून मनसेचे धीरज परब व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते यांच्या नेतृत्वाखालील ठिय्या आंदोलन सुरू केले होते.यावेळी काँग्रेसचे काका कुडाळकर यांनीही यावेळी पाठिंबा दिला होता.

याबाबत काल मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सदर पीडित महिला कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये येवून आपली गावचे तलाठी यांच्या विरोधात तक्रार दाखल करा, अशी आर्त विनंती करीत असताना मात्र, पोलिस प्रशासनाने मात्र त्या शासकीय कर्मचाऱ्याची तक्रार दाखल करून घेतली होती.परंतु त्या महिलेची तक्रार दाखल करण्यास पोलीसांनी टाळाटाळ केली होती.या पाश्र्वभूमीवर आज बुधवारी संतप्त झालेल्या नागरिकांनी सकाळी ११ वाजल्यापासून महिलेला न्याय मिळवण्यासाठी हे आंदोलन सुरूच ठेवले होते.तर त्या महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होणार असल्याचे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यानी बोलताना सांगितले.कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांनी त्या महिलेची तक्रार दाखल करून घेणार असल्याचे आंदोलनकर्त्याना आश्वासन दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन नागरिकांनी मागे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page