कणकवली- /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महावितरणचे काम संशयास्पद आहे.कमी दर्जाच्या वायरचा वापर तसेच लोकांना स्थानिक जमीन मालकांना विश्वासात न घेता पोल टाकणे अशी कामे चालू आहेत.जिल्हयात स्वप्नगंधा व कमलादेवी अशा दोनच कंपनीना वारंवार ठेका दिला जातो.सदर कंपनीच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत.तरी या ठेकेदाराला कामे देवू नयेत अशी मागणी राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.भगत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस रुपेश जाधव,कृषिसेल जिल्हा अध्यक्ष समीर आचरेकर,मारुती पवार,देवेंद्र पिळणकर,जयेश परब,रोहन नलावडे,सागर वारंग आदी राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,स्वप्नगंधा कंपनीच्या ठेकेदाराने देवगडमध्ये काम करत असताना आंबा काजू बागेला आग लागली होती.सदर ठेकेदारावर कोणती कारवाई केली?आणि जर कारवाई केली असेल तर अशा निष्काळजी पणे काम करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा ठेका का दिला जातो.यामध्ये महावीतरणच्या अधिकाऱ्याचा लागेबंध्ये असल्याचा सवश्य आहे.
जिल्ह्यामध्ये काम करताना कमी दर्जाची वायर वापरली जाते.सदर काम करताना वायरमानाच्या जीवाला धोका पोहचू शकते.तसेच जीवित हानी हानी होऊ शकते.अशा ठेकेदाराना कामे देवू नयेत. तसेच स्वप्नगंधा व कमलादेवी या कंपनीच्या गेल्या पाच वर्षातील कामाचा तपशील व माहिती मिळावी.अशी मागणी करण्यात आली असून सदर ठेकेदावर कारवाई न झाल्यास राष्ट्रवादीच्या माध्यमातून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
यावर श्री. भगत म्हणाले,संबंधित कामाची माहिती घेवून तसेच ठेकेदाराची माहिती घेवून अभियंता श्री.मोहिते साहेब आल्यावर संबंधितावर योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले.

फोटो- अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.भगत याच्याकडे निवेदन देताना अनंत पिळणकर सोबत रुपेश जाधव,समीर आचरेकर,मारुती पवार, देवेंद्र पिळणकर आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page