✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ प.स.माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांची भाजपच्या कुडाळ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.तसे नियुक्तीपत्र देऊन या निवडीबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीही संजय वेंगुर्लेकर यांचे अभिनंदन केले आहे.कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेनेचे जुने जाणते कार्यकर्ते आणि सामाजिक जाणिवेतून फुललेले व्यक्तिमत्व म्हणजेच संजय वेंगुर्लेकर त्यांची आज भाजपाचे कुडाळ तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आंदुर्ले पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

शिवसेनेचे नेते संजय पडते,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर व कुडाळचे माजी सभापती कै.बाळा जळवी यांच्या वरदहस्ताखाली फुललेले व्यक्तिगत म्हणजेच संजय वेंगुर्लेकर होय.गेली १५ ते २० वर्षे या नेत्यांच्या हाताखाली वावरताना त्यांचे सामाजिक कार्य पाहून प्रभावित झालेले संजय वेंगुर्लेकर हे पुढे राजकारणातही घडत गेले. आंदुर्ले पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थांवर कोणत्याही वेळी कोणताही प्रसंग असो..पक्षाची कोणतीही पादत्राणी असो ती बाजूला सारून संजय वेंगुर्लेकर तेथे पोहोचले नाहीत.असे झाले नाही.त्यामुळे त्यांची कुडाळ पंचायत समिती सदस्य ते सभापती अशी त्यांची सामाजिक कार्यातून झालेली घौडदौड वाखाणण्याजोगी आहे.

दरम्यान यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली,महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे,रणजीत देसाई,विनायक राणे,बंड्या मांडकुलकर,विलास कुडाळकर, आनंद शिरवलकर,राकेश कांदे भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी संजय वेंगुर्लेकर यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page