▪️कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नसल्याचे केले जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांना कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजप कडून जाहीर करण्यात आले. मात्र आज बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी स्वतः कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन आपण कायम आ. वैभव नाईक आणि शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगितले. मला सर्वसामान्य शिवसैनिकांनी व ग्रामस्थांनी निवडून दिले आहे याची मला पूर्णतः जाण आहे.त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नाही असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे चुकीची माहिती देणारे भाजप पदाधिकारी तोंडावर पडले आहेत.

यावेळी खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी संतोष पानवलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजपकडून सरपंचाची फसवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. इतर सरपंचांनी देखील सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी केल्या. यावेळी विभाग संघटक संतोष घाडी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, शाखाप्रमुख अभिमन्यू येरम, ग्रा.प.सदस्य राजू घागरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page