▪️सावंतवाडी तालुक्यातील घटना..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी तालुक्यातील कोनशी येथील गावात शेतात गेलेल्या युवतीचा विनयभंग करून तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केवळ युवतीच्या धैर्यामुळे फसला. मात्र या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत युवतीच्या कुटुंबियाने बांदा पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. याप्रकरणी बाबलो शंकर वरक (४०, रा. कोनशी टेमवाडी) याच्याविरोधात भादंवि कलम ३०७, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला ताब्यात घेण्यासाठी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या नेतृत्वाखाली पथक कोनशी येथे दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page