▪️कुडाळ येथे ओबीसी संघटनेची विचारमंथन सभा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

सध्याच्या परिस्थितीत जो समाज जागृत राहतो त्या समाजाचे प्रश्न वेळीच सोडविले जातात,पण झोपलेल्या समाजाचे प्रश्न सोडवले जात नाही.त्यामुळे ओबीसी समाजाने जागृत होऊन आपले न्याय प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे, तरच शासन दरबारी आपले न्याय प्रश्न सुटतील, राजकारणी व राज्यकर्ते सुद्धा दखल घेतील. एकुणच जो ओबीसी से बात करेगा ओ ही देश पे राज करेगा’ असे ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सोमवारी ओबीसी विचारमंथन सभा कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे झाली. त्यानंतर डॉ. तायवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे महासचिव सचीन राजुरकर, प्रदेश अध्यक्ष प्रकाश भागवत, राज्य अध्यक्ष एकनाथ तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तारमाडे, युवा प्रवक्ते रसिक ,राऊत, आनंद मेस्त्री, सुनील भोगटे, काका कुडाळकर, नंदन वेंगुर्लेकर, रमन वायंगणकर, आनंद मेस्त्री,सुनील डुबळे, बाळा कनयाळकर आदी उपस्थित होते.

डॉ. तायवाडे म्हणाले, आम्ही पाच वर्षांपूर्वी ओबीसी संघटना बांधणी सुरू केली, त्याला आता यश येत आहे. राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आता ओबीसी बाबत चर्चा करू लागले आहेत, हे आपल्या चळवळीचे यश,युवक आणि ओबीसी लोकांच्या कल्याणाकरिता शासनाला काढण्यास भाग पाडले. त्यामध्ये प्रामुख्याने ‘महाज्योती’ सारखी संस्था सुरू झाली आहे. त्यामधून एमपीएससी, यूपीएससी आदी परीक्षांचे मोफत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ हॉस्टेल सुद्धा सुरू होणार आहेत. विधानसभा, लोकसभेत सुद्धा ओबीसी समाजाला आरक्षण लागू व्हावे, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सुद्धा २७ टक्के आरक्षण पूर्वीप्रमाणे ओबीसी समाजाला लागू व्हावे अशी आमची मागणी आहे. ओबीसी समाज कमीत कमी ५२ टक्के आणि जास्तीत जास्त ६० टक्के आहे.

खरंतर ओबीसी समाजाला संविधान कलम ३४० चे १५ / ४ व १६ / ४ नुसार सोयी व सवलती केंद्र व राज्य सरकारने दिल्या पाहिजे होत्या, मात्र दुर्दैवाने त्या दिल्या गेल्या नाहीत, आहे. म्हणूनच देशातील ओबीसी समाजाला सरकारकडून न्याय मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही कुठल्याही पक्षांशी बांधील नाही. सन २०१६ पासून २०२३ पर्यंत ३३ जीआर हे विद्यार्थी,ओबीसी मंत्रालय सुरू करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्हातही संघटनेच्या नियुक्त्या केल्या जातील. त्यासाठी प्रमुख मंडळींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. तायवाडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page