✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
अखेर कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी दिला नगराध्यक्ष पदाचा राजीनामा आज २२ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला आहे.१४ मे रोजी पक्षाने ठरवल्याप्रमाणे त्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी संपला होता.आता काँग्रेस पक्षा कडून अक्षता खटावकर या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणार आहेत.नगराध्यक्ष पदाची निवडणूक होईपर्यंत उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्याकडे पदभार राहणार आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.
