✍🏼 लोकसंवाद /- आंबोली.
जम्मू-काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लढताना शहीद झालेल्या आंबोली येथील शौर्यचक्र प्राप्त शहीद पांडुरंग गावडे यांना आज आजी-माजी सैनिकांसह ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या आंबोलीतील स्मारकाच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी केलेले कार्य हे न विसरणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीला सदोदित देत राहील, अशी भावना यावेळी उपस्थित माजी सैनिकांकडून व्यक्त करण्यात आली.
याठिकाणी त्यांचे आई, वडील तसेच कुटुंबीय, जिल्हा सैनिक कल्याण सहाय्यक अधिकारी श्रीधर गावडे, हवालदार संजय गावडे, कॅप्टन शंकर गावडे, सुभेदार नामदेव पारधी, ऑनररी कॅप्टन धोंडी बाबाजी गावडे, हवालदार मनोहर राऊत, हवालदार राजाराम गावडे, कॅप्टन शांताराम गावडे, सैनिक स्कूल माजी प्राचार्य सुरेश गावडे, सुभेदार दशरथ पारधी, तुकाराम नाटकर, आप्पा गावडे, हवालदार गणपत गावडे, नायक शिवाजी परब, हवालदार अनिल नाटलेकर, ऑनररी कॅप्टन शांताराम गावडे, लक्ष्मण पारधी, विजय गुरव, विजय जाधव, नारायण पारधी, कृष्ण सावंत, चंद्रकांत राऊत, राजेश गावडे, जाणू पाटील, कल्पना झेंडे, स्वप्नीता कर्पे, शिवनाथ कोरगावकर, दीपक भिसे, कल्पेश परब तसेच शाळेतील दहावीचे वर्गमित्र,आजी माजी सैनिक ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी मानवंदना तसेच श्रद्धांजली वाहिली. तसेच देशाप्रति आणि सैनिकांप्रती भाव व्यक्त केले. या ठिकाणी आजी माजी सैनिकांतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
