✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी पदी अरविंद नातू यांची नियुक्ती झाली असून त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे.मुख्याधिकारी त्यांचे महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच नगर पंचायत अधिकारी-कर्मचारी यांनी स्वागत केले.

कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांची बदली झाल्यानंतरया पदाचा अतिरिक्त कार्यभार वैभववाडी न. पं. चे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्याकडे देण्यात आला होता.त्यानंतर महिनाभरापूर्वीच प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून करिष्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांचा प्रशिक्षण कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आता अरविंद नातू यांची याठिकाणी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.श्री.नातू हे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते.त्यांची कुडाळ येथे प्रशासकीय बदली झाली आहे.कालच १७ मे.रोजी बुधवारी श्री. नातू यांनी कुडाळ न. पं मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page