✍🏼लोकसंवाद /- मुंबई.

जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यांना सोमवारी चौकशीला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा आज निकाल येणार आहे. त्याचवेळी ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना धक्का बसला आहे. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

ILFS च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी या प्रकरणात राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी बजावत चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. ILFS प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page