✍🏼लोकसंवाद /- आचरा.

आचरा गावच्या सामाजिक ,शैक्षणिक,सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे वयाच्या 74वर्षी दुःखद निधन झाले. वैभवशाली पतसंस्थेचे ते गेली 27 वर्षे चेअरमन म्हणून कार्यरत होते. वैभवशाली पतसंस्थेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळे वैभवशाली पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होत होती 1989 पासून ते सलग अठरा वर्षे रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. ते गेली सोळा वर्षे वाचनालयाचे अध्यक्ष पद सांभाळताना . वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले होते. साईसेवा मंडळ आचराचे ते सर्वेसर्वाच होते. काकड आरती कार्तिकोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दर वर्षी पंढरपूर वारी आणि रामेश्वर मंदिर आवारात गंगापूजनाचा कार्यक्रम भव्यदिव्यतेने होत होता. मुंबई बहिशाल शिक्षण केंद्राचे उपक्रम आचरा येथे राबविण्यात त्यांचा पुढाकार होता. राज्यस्तरीय शुटींगबाल स्पर्धा आचरे येथे आयोजित करण्यात येथील युवाई सोबत त्यांचा पुढाकार होता. न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक स्कूल कमिटी वर त्यांनी अनेक वर्ष चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळला होता. आचरा येथील प्रथितयश व्यापारी म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्याच पुढाकारातून आचरा व्यापारी संघटना स्थापन करण्यात आली होती. कित्येक वर्ष ते या संघटनेचे अध्यक्ष होते. सध्या ते प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेली काही वर्षे त्यांची प्रकृती ठिक नव्हती. तरी त्यांचे समाजिक कार्य सुरुच होते. मागील महिन्यात त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले. आज आचरा येथील स्मशानभूमित त्यांच्यावर शोकाकुल वातावरण अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे एक मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ भावजय, असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page