▪️युती कशाला पाहिजे मैत्रीपूर्ण लढण्याचा तेलीनी लगावला टोला..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल आवाहन मी स्विकारीन. परंतु केसरकर यांनी वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन युतीसाठी रडत बसू नये, असा पलटवार भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केला. दरम्यान युती कशाला पाहिजे ? मैत्रीपूर्ण लढत लढू, असा टोलाही ही तेली यांनी यावेळी केसरकर यांना लगावला. श्री. तेली आज सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, मनोज नाईक, आनंद नेवगी, रवि मडगावकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
