✍🏼लोकसंवाद /- देवगड.

गुंगीचे औषध देवून तळेरे येथील रिक्षाचालकास लुटणाèया संशयित आरोपीला देवगड पोलिसांनी गुजरात अहमदाबाद येथून जेरबंद केले आहे यातील संशयित महिला आरोपी अद्याप फरार आहे.

विशाल जयंतीभाई परमार रा.अहमदाबाद गुजरात असे संशयिताचे नाव असून त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तळेरे येथील रिक्षाचालक संजय तुकाराम तळेकर(६५) यांना गुंगीचे औषध देवून रिक्षेतून प्रवास करणाèया एक अनोळखी संशयित पुरूष व एक महिला अशा दोन प्रवाशांनी लुटले होते. सोन्याचा ऐवज व ८ हजाराची रोेकड मिळून सुमारे ८४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल संशयितांनी लुटल्याचे फिर्यादी रिक्षाचालक संजय तुकाराम तळेकर रा.तळेरे गावठण यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. ही घटना २६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वा सुमारास घडली होती. देवगड पोलिस स्थानकात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. २६ सप्टेंबर २०२२ रोजी तळेरे रिक्षा स्टँड येथे आलेल्या अनोळखी संशयित आरोपींनी रिक्षाचालक संजय तळेकर यांना आपल्याला तळेबाजार येथे देवीच्या दर्शनासाठी जायचे आहे असे सांगून ते रिक्षेमध्ये बसले. रिक्षामध्ये बसल्यानंतर संशयितांनी तळेकर यांना पेढा खायला दिला. रिक्षा जामसंडे नजिकच्या परिसरात आली असता संशयितांनी तळेकर यांना थंड पेयातून गुंगीकारक औषध टाकून ते प्यायला दिले. तळेकर हे बेशुध्द झाल्यानंतर त्यांच्याकडील सर्व सोन्याचा ऐवज व रोकड संशयितांनी लंपास केली. यात ५० हजार रूपये qकमतीची २० ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन, १२ हजार रूपये qकमतीच्या प्रत्येकी ४.५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याचा अंगठ्या, १४ हजार रूपये qकमतीच्या प्रत्येकी तीन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याचा अंगठ्या, ८ हजाराची रोकड, ५०० रूपये (कमतीचे सोनाटा कंपनीचे जुने घड्याळ असा सुमारे ८४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल संशयितांनी लंपास केला. याबाबत तळेकर यांनी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांवर भादवि कलम ३२८, ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. यानंतर. पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र कांबळे आणि पोलिस हवालदार प्रविण qबके या टीमने गुजरातमध्ये जावून अहमदाबाद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या सहकार्याने संशयिताला ताब्यात घेतले. यातील संशयित महिला अद्याप रार आहे तर दुसरा संशयित उपेंद्र पटेल याला आठ दिवसापुर्वीच ताब्यात घेतले असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मुख्य आरोपी विशाल परमार हा सराईत अट्टल गुन्हेगार असून गुजरात येथील दारूकांडमधील तो प्रमुख आरोपी होता. त्याला १० वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा झाली होती. गुजरातमधील अनेक गुन्ह्यात त्याचा समावेश आहे. त्याला देवगड न्यायालयासमोर हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page