लोकसंवाद /- सावंतवाडी.
सावंतवाडी जिमखाना मैदान येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून ग्लेन जॉन डिसोझा, वय. १९ रा. चराठा सावंतवाडी येथिल युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.स्विमींग करत असताना पाण्यात उडी घेतल्यानंतर तो वर आला नाही.यावेळी येथे उपस्थित ट्रेंनरनी त्याला लागलीच बाहेर काढलं.परंतु, तो प्रतिसाद देत नसल्यानं त्याला रूग्णालयात हलवले.मात्र, यानंतर काही वेळानं त्याला मृत घोषित करण्यात आले.पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते त्याचा अधिक तपास करत आहेत.
