✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी, वेंगुर्ले च्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर व व्हाईस चेअरमन पदी सौ. अंकीता आनंद बांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली १९९४ मध्ये स्थापन झालेल्या भंडारी पतसंस्थेचे बाबली वायंगणकर हे १९ वे चेअरमन आहेत. एकूण १२ संचालक असलेल्या या पतसंस्थेत ११ संचालक बिनविरोध निवडून आलेले असून एक जागा रिक्त आहे. चेअरमन पदी बाबली वायंगणकर यांची निवड जाहीर झाल्यानंतर भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी पतसंस्थेत जाऊन त्यांचे व व्हा. चेअरमन अंकिता बांदेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी संचालक सौ. सारीका काळसेकर, प्रकाश गडेकर, जगन्नाथ डोंगरे, गुरुनाथ कांबळी, व्यवस्थापक रेडकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page