✍🏼लोकसंवाद /- देवगड.

देवगड येथील नगर पंचायतच्या एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देत देवगड-जामसांडे महविकास आघाडी गटाशी काडीमोड घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच देवगड जामसांडे नगर विकास समिती गटात सामील होण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपचे आ नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

यावेळी त्यांच्या समवेत आ नितेश राणे आणि भाजपचे नगरसेवक तसेच मिताली सावंत यांच्या वॉर्डातील जेष्ठ मंडळी उपस्थित होती. मिताली सावंत यांनी महा विकास आघाडीशी काडीमोड घेतल्याने देवगड जामसांडे नगर पंचायतीत सत्तांतर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विद्यमान नगराध्यक्ष यांची अडिज वर्षाची मुदत संपल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत हे सत्तांतर अटळ आहे. दरम्यान, यापूर्वीच महा विकास आघाडीचे ठाकरे गटाचे एक नगरसेवक अपात्र ठरले आहेत. त्यामुळे देवगड जामसांडे नगरपंचायतीत महा विकास आघाडी अल्पमतात आली असून राजकीय कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page