✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

अपघात टाळण्यासाठी सावंतवाडी शहरात केलेला बहिर्वक्र आरसे बसून विशाल सेवा फाउंडेशन कडून शहरात राबविण्यात आलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे मत माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी व्यक्त केले. भविष्यात विशाल सेवा फाउंडेशन कडून असेच उपक्रम होत राहो अशा शुभेच्छा ही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.दरम्यान शालेय विद्यार्थी तसेच वाहन चालकांना होणारे अपघात लक्षात घेता शहरात तब्बल 20 ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसवण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने हे २० ठिकाणी हे आरसे बसवण्यात येणार आहेत. भविष्यातही विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून असेच सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर,चराठा उपसरपंच अमित परब, विनोद सावंत, अनिल सावंत, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page