▪️केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट,कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम चे होणार उदघाटन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.

माननीय खासदार श्री नारायणरावजी राणे साहेब, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री भारत सरकार यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने स्नेहबंध’ कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता करण्यात आले आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम चे उदघाटन सोहळा तसेच बँकेच्या आर्थिक वर्षात उल्लेखनिय काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव मा. खा. श्री. नारायणराव राणे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सदर ‘स्नेहबंध’ सोहळा कार्यक्रम आराध्या हॉटेल, झाराप झिरो पॉईन्ट, नेमळे ब्रिज जवळ, मुंबई गोवा महामार्ग, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्री. प्रमोदजी सावंत, मुख्यमंत्री गोवा राज्य, माननिय श्री. रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग, माननीय श्री. आनंदराव अडसुळ, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री. माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर, अध्यक्ष- गोवा बागायतदार संघ, माननीय सौ. नीलमताई राणे अध्यक्षा जिजाई महिला सेवा संस्था ओसरगांव, माननिय श्री. निलेश राणे, माजी खासदार, माननिय आमदार श्री. नितेश राणे, माजी आमदार श्री. राजन तेली, श्री. अतुल काळसेकर उपाध्यक्ष जिल्हा बँक, जिल्हा बँकेचे सर्व संचालक मंडळ व जिल्हयातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्नेहबंध’ सोहळा कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री मनिष दळवी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page