✍🏼लोकसंवाद /-ओरोस.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नूतन राज्य शिक्षक नेते पदी निवड झालेले उदय शिंदे,राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांचा भव्य सत्कार सोहळा व शिक्षक समितीचे सर्व प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक यांचा सन्मान कार्यक्रम, कार्यकर्ता चेतना मेळावा दि 31 मार्च 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे दु 2.30 ते 5.00या वेळात संपन्न होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री नारायण नाईक यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितले आहे.
