🛑लोकसंवाद /- कुडाळ.

साळगाव येथे सिंधुदुर्ग पोलिसांकडून तब्बल ७ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर ६ लाखाची गाडी मिळून एकुण १२ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाबाजी विजय नाईक (वय ४० रा. खासकीलवाडा – सावंतवाडी) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई आज सकाळी ६ वाजता साळगाव येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या ब्रिज खाली करण्यात आली.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस हवालदार अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, यशवंत आरमारकर, चंद्रहास नार्वेकर, प्रथमेश गावडे, गुरुनाथ कोयंडे, अमित पालकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page