✍🏼लोकसंवाद /- ओरोस.
कसाल येथील मोबाईल दुरुस्ती व्यवसायिक सचिन भोसले यांचा खून सख्ख्या भावाकडूनच झाल्याचे तपासात उघड झाले आहे. डोक्यात लोखंडी रॉड मारल्यामुळे त्यांची कवटी फुटून ते जागीच ठार झाले. हा प्रकार काल सकाळी उघड झाला होता. या प्रकरणी रात्री उशिरा त्यांचा भाऊ वामन उर्फ संतोष श्रीकांत भोसले याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
