✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ मध्ये होणाऱ्या “शिवगर्जना” या महानाटयाची पुर्व तयारी अंतीम टप्प्यात आला असून भाजप युवानेते विशाल परब हे स्वतः जातिनिशी उभारण्यात येत असलेल्या मंडपाची व मैदानाची केली पाहणी आहे.भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात १७ मार्च रोजी “शिवगर्जना” या महानाट्यातून सिंधुदुर्गवासीयांना शिवकालिन इतिहास अनुभवता येणार आहे.
तर या “शिवगर्जना” महानाट्यात हत्ती उंट घोडयांचा सहभाग असणार आहे.तर मोफत पासेसच्या माध्यमातून सिंधुदुर्गवासीयांना आशिया खंडातील “नंबर”वन असलेले “शिवगर्जना” हे महानाट्य पाहावयास मिळणार आहे.तर कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.शंकर चिंदरकर यांनीही मंगळवारी सायंकाळी कुडाळ एस.टी.डेपोच्या मैदानावर युवा उद्योजक विशाल परब यांची भेट घेऊन चर्चा केली.तसेच पोलीसांची गर्दीमुळे तारांबळ उडु नये, गर्दीवर नियंत्रण बाबत पोलीस बंदोबस्त यासाठी यावेळी श्री परब यांच्याशी चिंदरकर यांनी यावेळी चर्चा केली. डॉ.निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाऊंडेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने कुडाळ मध्ये नवीन एस.टी.बस स्टॅन्डच्या (डेपो) मैदानावर आशिया खंडातील सर्वात “नंबर”वन असलेले “शिवगर्जना’ हे महानाट्य होणार आहे.या महानाट्याची पुर्व तयारी पुर्ण झाली आहे.
या महानाट्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे,केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आमदार नितेश राणे यांच्यासह दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.हे महानाट्य सिधुदुर्गवासीयांना अनुभवता यावे यासाठी विशाल सेवा फाऊंडेशन मार्फत जिल्हाभरात मोफत पासेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत.तसेच ज्या व्यक्तिंना पासेस मिळाले नाहीत अशांसाठीही कुडाळ एस.टी.डेपोच्या मैदानावर काऊंटर उभारण्यात येणार आहे.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार डाॅ.निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब सेवा फाउंडेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने शिवगर्जना हे महानाट्य १७ मार्च रोजी होणार आहे.या महानाट्यात 1 हजार ते १२०० कलाकारांचा सहभाग असून हत्ती,घोडे, उंट,बैलगाडी याचा सहभाग आहे.तर या महानाट्या दरम्यान भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.तर या “शिवगर्जना” महानाट्यासाठी 200 फूट लांबीचा रंगमंच उभारण्यात येत असून व्हीआयपी व्यक्तींसाठी विशेष बैठक व्यवस्था असणार आहे.या व्यतिरिक्त सहा ठिकाणी भव्य स्किन उभारण्यात येणार आहे.या सोहळ्याला शिवप्रेमी नागरिक तसेच निलेश राणे यांचे चाहते मोठ्या संख्येने दाखल होणार असून, महामार्गाच्या पलिकडील जागेवर वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.
