✍🏼लोकसंवाद /- देवगड.
देवगड तालुक्यातील मोर्वे येथील श्री देव चव्हाटेश्वर शिमगोत्सव मंडळाच्या वतीने शिमगोत्सव निमित्त आयोजित केलेल्या खुल्या रेकॅार्ड डान्स स्पर्धेत अनुष्का गुरुनाथ कांदळगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.व्दितीय क्रमांक दिया संदीप गांवकर,तर काजल विष्णू धावडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला,या स्पर्धेत २० स्पर्धक सहभागी झाले होते,परीक्षक म्हणून कथक नृत्य विशारद सुप्रिया सूर्यकांत ढोके, सुमित सूर्यकांत ढोके उपस्थित होते,
या स्पर्धेदरम्यान उपस्थित अभिनेता घनशाम पुरुषोत्तम गांवकर,बुवा विठ्ठल तावडे,रत्नाकर मोर्वेकर,प्रणव धुरत,आदित्य नार्वेकर,,राजाराम टिकम आदींचा सन्मान करण्यात आला,यावेळी मंचकावर कृष्णा ढोके,माजी सरपंच कंकाद्रित लोणे,भाग्यवान बापर्डेकर,गोविंद गावकर,सत्यवान कांदळगावकर,गणपत धुरत,सुहास कोळबकर,दत्तात्रय टिकम,राजन लोणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता घनशाम पुरुषोत्तम गांवकर,अरविंद मोर्वेकर यांनी केले.
