✍🏼लोकसंवाद /- मालवण.

जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब मालवणच्या वतीने ब्युटी पार्लर व हेअर ड्रेसर्स व्यवसायात नाव लौकिक मिळविलेल्या उद्योजिका सौ. पूनम मीठबावकर – दूदवडकर व सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या सौ. शिल्पा खोत यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सौ. पूनम मिठबावकर- दूदवडकर यांनी मुंबई येथुन हेयर ड्रेसर्सचा डिप्लोमा पूर्ण करून मालवणात २००९ मध्ये अद्ययावत सोयीनी सुसज्ज असे लेडीज़ परी पार्लर सुरु केले. ग्राहकांचा वाढता ओघ पाहून २०२१ मध्ये पुरुष आणि स्त्रिया याकरीता एकत्रित परी यूनिसेक्स पार्लर सुरु केले. आज मालवणसह जिल्ह्यात त्यांनी या व्यवसायात नावलौकिक मिळविला आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान आहे, या यशस्वी उद्योजिकेचा रोटरी क्लब कडून सत्कार करून गौरव करण्यात आला. तसेच सौ. शिल्पा खोत या समाज कार्यासह महिला सबलीकरणामध्ये अग्रेसर आहेत. महिलाना एकत्र करून रक्तदान शिबीर, नारळ लाढविणे स्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा, स्वच्छता मोहिमा असे उपक्रम त्या राबवत असून स्वराज्य महिला ढोल पथकाची सुरुवात देखील त्यांनी केली. या कार्याबद्दल त्यांनाही रोटरी क्लबतर्फे गौरविण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रतन पांगे, सुहास ओरसकर, महेश काळसेकर, अनिल देसाई, प्रसन्न मयेकर, उमेश संगोडकर, सौ. सुविधा तीनईकर, रमाकांत वाक्कर, संदेश पवार, रंजन तांबे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page