दोडामार्ग /- प्रशांत गवस
शैक्षणिक वर्ष २०२२ – २३मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत शिरंगे पुनर्वसन शाळेचा विद्यार्थी गौरेश नितेश गवस मोठा गट मुलगे लांब उडी – जिल्हास्तर प्रथम तसेच उंच उडी – जिल्हास्तर प्रथम क्रमांक मिळवून शाळा गाव व तालुक्याचे नांव उज्ज्वल केले असून त्याला मुख्याध्यापक नाईक सर उपशिक्षक भोसले सर पालवे सर यांचे मार्गदर्शन लाभले. गौरेश ने यश संपादन करण्यामागे शिरंगे पुनर्वसन शाळेच्या सर्व शिक्षकांचे मोठे योगदान असुन गौरेश ह्या घवघवीत यशा बद्दल विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचे देखील कौतुक केले जात आहे तसेच गौरेशला मिळालेल्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे त्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ सुहानी गवस केंद्रप्रमुख पाटगांवकर सर गट शिक्षण अधिकारी नदाफ, शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी अभिनंदन केले.
