वेंगुर्ला /-

राज्य संरक्षित स्मारक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला, रेडी गावातील किल्ले यशवंत गडास अनधिकृत बांधकामापासून वाचविण्यासाठी सुरू असलेल्या शिवप्रेमींच्या बेमुदत आमरण उपोषणास दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा जाहीर पाठिंबा दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पासून अनधिकृत बांधकामापासून जलदुर्ग यशवंतगड ला वाचवण्यासाठी श्री राजन रेडकर व भूषण मांजरेकर यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणास दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागच्या सदस्यांनी उपोषणकार्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन, जतन नियमोचित व्हावे, त्याचप्रमाणे ऐतिहासिक वास्तू असलेल्या गडांच्या नियंत्रित क्षेत्रात अनधिकृत बांधकामे होऊ नये याची जतन व देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी पुरातत्व विभाग, पर्यावरण विभाग, सीआरझेड व तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात असल्याने संबंधित बांधकामे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे कायदेशीर अधिकार प्राप्त असतांनाही त्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक केलेल्या निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे अशा अनधिकृत बांधकामांपासून आर्थिक लाभ व्हावा हा एकमेव हेतू ठेवून काम केल्याने आपला ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा असलेल्या गड किल्ल्याचा पर्यटनाच्या नावाखाली इतिहास पुसून टाकण्याची जणू काही यांनी सुपारी घेतल्यासारखे वागत असून त्या बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांनवर महाराष्ट्र शासनाकडून कारवाई केली जात नाही याकरिता शिवप्रेमींना बेमुदत आमरण उपोषण करावे लागते हे आपले दुर्दैव आहे. सर्व दुर्गप्रेमी संस्था, दुर्गप्रेमी यांनी प्रत्यक्ष उपोषणास बसणे शक्य होत नसले तरी किमान या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देऊन किमान साथ तरी द्यावी असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page