✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक व विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे विश्वासू डॉ.अमेय देसाई यांनी शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली. हे स्मारक होण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधी यांचे मार्फत शासकीय दफ्तरी झालेला पाठपुरावा जाणून घेऊन येणा-या समस्यांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर गांधी स्मारक प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन डॉ.अमेय देसाई यांनी दिले.