कोल्हापूर. /-
इतर राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे..त्यात महाराष्ट्र राज्यात विविध निवडणूका,पोटनिवडणुका विधानसभा,विधान परिषद, स्थानिक पातळीवरील अशा निवडणूका सुध्दा महाराष्ट्र राज्यात होऊ पाहात आहे.
राज्यात कोरोना महामारी ने प्रचंड प्रमाणात तोंड उघडलं आहे, साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व प्रशासन विविध उपाययोजना कसोशीने प्रयत्न सुरक्षित पणे करत आहे. राज्यातील विविध शासकीय यंत्रणा कोरोना योद्धे म्हणून आहेत. शासनाचे सर्व अधिकारी,शिक्षक, कर्मचारी कोरोना ड्युटी वर जोडले आहे,तरी राज्यात जो पर्यंत शाळा ,महाविद्यालय सुरू होणार नाही, तो पर्यंत कोणत्याही प्रकारच्या निवडणुका जाहीर करण्यात येऊ नये.
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदार संघातील निवडणूक ही शाळा,महाविद्यालय सुरू झाल्यावरच महत्त्वाची, संबंधित आहे.
इतर स्थानिक पातळीवर निवडणूकासाठी इतर निवडणूक आयोग च्या कामासाठी शिक्षकांना कोरोना महामरी काळात निवडणूक ड्युटी करावयास लावू नये. वयोवर्ष ५५च्या पुढील सर्व कर्मचारी, अधिकारी,शिक्षक, पोलिस यांना दीर्घकाळ आजार असणारे महिला व पुरुष यांना निवडून कामातून वगळण्यात यावे.
या निवेदनाची गंभीरपणे दखल घ्यावी अशी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशन च्या वतीने विनंती मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग यांना करण्यात येत आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेब गोतारणे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशन यांनी व्यक्त केली .