✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी.

घराच्या वादातून बहिणीला मारहाण केल्याचा प्रकार नारी येथे घडला आहे. यात संबधित महिला जखमी झाली आहे. स्नेहल सुर्यकांत गुरव (रा. मुंबई) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी स्नेहल गुरव या मुंबई येथे राहातात. त्यांचे ऐनारी येथे वडिलोपार्जित घर आहे. गेली २० वर्षे त्या गावी आल्या नाहीत. महाशिवरात्री जत्रे निमित्त त्या गावी आल्या होत्या. त्यांनी आपले चुलत भाऊ सुरेश गंगाराम गुरव यांना आपले वडिलोपार्जित घर कुठे आहे. अशी विचारणा केली. इतक्या वर्षानंतर घर विचारायला आल्याचा त्यांना राग आला. त्यांनी व अजीत अशोक गुरव, अरविंद अशोक गुरव, अभिजीत अशोक गुरव या चौघांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार स्नेहल गुरव यांनी वैभववाडी पोलिसात केल्यावरुन माराहाण करणाऱ्या चौघांवर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो.सुनिल पडेलकर व राहुल पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page